RSON Agrotech Automation

आर-सन अॅग्रोटेक ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड हि एक अभिनव सिंचन प्रणाली तयार करणारी कंपनी आहे. आम्ही वडिलोपार्जित शेती व्यवसाय करत असून, गेल्या काही वर्षांपासून शेती करताना येणाऱ्या समस्या आणि ढासळलेली उत्पादन क्षमता याचा अत्यंत जाणीव पूर्वक अभ्यास केला आहे. आज शेतीची देखभाल करण्यासाठी ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या समस्या आम्ही गांभीर्याने समजून घेतल्या आहेत. आमचे मुख्य उद्दिष्ट अत्याधुनिक सिंचन कंट्रोलर्सच्या वापराद्वारे सिंचन सुलभ करणे, पाणी वाचविणे आणि उत्पादनात वाढ करणे हे आहे आणि ते साध्य करण्यासाठी आम्ही स्मार्ट इरिगेशन ऑटोमेशन हे प्रॉडक्ट तयार केले असून या प्रॉडक्ट ची किंमत देखील सर्व शेतकऱ्यांना परवडणारी आहे.

अधिक जाणून घ्या

RA-SM-19

हे प्रॉडक्ट आम्ही खास सर्वसाधारण शेतकरी ते मध्यम वर्गीय शेतकऱ्यांसाठी बनवलेले असून याची किंमत बाजार पेठेतील इतर प्रॉडक्टपेक्षा कमी आणि सर्व सामान्यांना परवडेल अशी ठेवलेलीली आहे. या प्रॉडक्टची गुणवत्ता आणि रचना यामध्ये आम्ही कसल्याही प्रकारची तडजोड केलेली नाही. या प्रॉडक्टची गुणवत्ता उत्तम दर्जाची असून देखभाल करण्यासाठी अधिक खर्च लागत नाही, अगदी ४-५ एकर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त आणि महत्वाकांक्षी अशी स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणाली आम्ही तयार केली आहे. या उपकरणामुळे प्रत्येकाच्या वेळेची बचत होत असून, हि प्रणाली मोबाइल अॅपद्वारे कार्य करते. त्यामुळे तुम्ही भारतातल्या कोणत्याही ठिकाणाहून शेतीला पाणी आणि खते देऊ शकता.

अधिक जाणून घ्यातांत्रिक तपशील

शेतीसाठी अत्याधुनिक फायदे

उत्पादन मध्ये तीव्र सुधारणा

वीज आणि पाणी वाचवते

वापरण्यास सोप Android application

श्रम खर्च बचत

आमच्या उत्पादने आणि सेवांबद्दल अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा