RSON बद्दल थोडक्यात

RSON Agrotech Automation Private Limited हि पुणे, भारतस्थित ठिबक सिंचन ऑटोमेशन प्रॉडक्शन कंपनी आहे. आमचा शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे शेती विषयीच्या सर्व अडचणींचा अचूक अभ्यास करणे आम्हाला शक्य झाले. तसेच आम्ही भारतीय शेती, भारतीय अर्थव्यवस्था, आणि तांत्रिक गोष्टी यांचा सखोल अभ्यास केला आणि सर्वसामान्य क्षेत्र धारक ते मध्यम क्षेत्र धारक असलेल्या शेतकऱ्यांना परवडेल अशा प्रकारचे तंत्रज्ञान विकसित केले.

RA-SM-19 हे आम्ही बनवलेले पहिले प्रॉडक्ट असून याची निर्मिती करत असताना नैसर्गिक, अनैसर्गिक घटकांचा तसेच वातावरणाचा या उपकरणावर कसलाही परिणाम होणार नाही याची दक्षता आम्ही घेतली. RSON AGROTECH SMART IRRIGATION (RA-SM) अशा सिरीज प्रमाणे आमच्या प्रॉडक्टचे मॉडेल्स उपलब्ध होणार आहेत. ३-४ एकर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्याला देखील हे उपकरण परवडणारे असून याचे अनेक फायदे देखील शेतकऱ्यांना लाभदायक ठरणार आहेत. वेळेची बचत, पाण्याची बचत, रात्री अपरात्री शेतीला पाणी देण्यापासून सुटका, तसेच लोड शेडिंगवर मात असे अनेक फायदे आम्ही शेतकऱ्यांना या उपकरणातून करून दिले आहेत.

संचालक

राज ताकवणे

माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक, आणि रिसर्च करण्याचे कौशल्य अगदी कॉलेजमधे शिकत असल्यापासूनच यांच्या अंगी होते. शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा शेतीसाठी कसा उपयोग करून घेता येईल आणि याचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना कसा फायदा होईल हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.


राज ताकवणे यांचे शिक्षण इलेक्ट्रॉनिक & टेलेकॉम्युनिकेशन या विभागातून झाले आहे. स्मार्टऑटोमेशन इर्रीगेशन सिस्टिम हि प्रणाली त्यांनी तयार केली असून यासाठी शेतकऱ्यांची अधिक मागणी त्यांच्याकडे होत आहे.

आमचा दृष्टीकोन

भारतातील शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे नाविन्यपूर्ण आणि टिकाऊ तंत्रज्ञानाचा वापर करून व्यापक स्वरुपात ड्रिप ऑटोमेशन सिस्टिम तयार करणे आणि त्यामधे सतत सुधारणा आणि वितरण करून नेतृत्वाची स्थिती प्राप्त करणे.

आमचे कार्य

आमचे ग्राहक हेच आमचे खरे मूल्य असल्याने आम्ही आमच्या ग्राहकांना नाविन्यपूर्ण, टिकाऊ ऑटोमेशन तंत्रज्ञान उत्पादने आणि सेवा वितरीत करून मानवी मूल्यांसाठी आदर निर्माण करण्याचा प्रयत्न करू.

आमच्या उत्पादने आणि सेवांबद्दल अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा